S M L

देवनार आगीला शिवसेनाही जबाबदार - किरीट सोमय्या

Sachin Salve | Updated On: Mar 27, 2016 05:01 PM IST

Kirit somaiyaमुंबई - 27 मार्च : देवनार कचरा डेपोची आग वारंवार लागतेय. शिवसेना गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत आहे. सर्व निर्णय सेनाच घेत आहे मग आगीची जबाबदारीही सेनेनं घेतली पाहिजे अशी घणाघाती टीका भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केलीये.

देवनार कचरा डेपो बंद करण्यासाठी आज (रविवारी) भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी कचरा डेपोसमोर धरणे आंदोलन केलं. मुंबईतील तीनही कचरा डेपो बंद करण्याची मागणी यावेळी सोमय्या यांनी केली. कचरा डेपोमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय. 6 हजार टन ऐवजी 10 हजार टनचे पेमेंट केलं जातंय हा पैसा कुठे जातोय असा असा आरोप सोमय्यांनी केली. तसंच शिवसेना सर्व निर्णय घेत असते तर या आगीची जबाबदारी सुद्धा शिवसेनेने घेतली पाहिजे असं म्हणत शिवसेनेवर तोफ डागली. यात कचरामाफिया, पालिका अधिकारी आणि पदाधिकारी सामील आहे म्हणूनच याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. या सर्वांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2016 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close