S M L

भारताचा 'विराट' विजय, कांगारूंना लोळवून सेमीफायनलमध्ये धडक

Sachin Salve | Updated On: Mar 28, 2016 03:35 PM IST

भारताचा 'विराट' विजय, कांगारूंना लोळवून सेमीफायनलमध्ये धडक

मोहाली - 27 मार्च : मॅच जिंकणे म्हणजे काय असते ते आज पुन्हा एकदा विराट कोहलीने दाखवून दिले. ऐन मोक्याच्या क्षणी जिगरबाज खेळी करत विराट कोहलीने अक्षरश: विजय खेचून आला. विराटच्या 82 रन्सच्या नॉटआऊट खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 161 धावांचं टार्गेट भारताने नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणजे धोणीच्या विनिंग शॉटने जिंकलीये.

मोहालीमध्ये पीसीए स्टेडियमवर सेमीफायनलसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगलेला थरार याची देही याची डोळा आज तमाम भारतीयांनी डोळ्यात साठवला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 161 रन्सचं टार्गेट आव्हान दिलं. सुरुवात भारताची खराबच झाली. शिखर धवन आणि रोहित शर्मा झटपट आऊट झाले. शिखर धवन 13 रन्स तर रोहित शर्मा 12 रन्सवर आऊट झाले. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि युवराज सिंगने इंनिंग सांभाळली. पण युवराजला दुखापत झाल्यामुळे तो जास्त वेळ पिचवर टिकू शकला नाही. युवराजने 21 रन्सची खेळी करून विराटला साथ दिली. वाढता रनरेट पाहता टीम इंडियावर दबाव आला होता. मॅच हातातून जाते की काय अशी पाल चाहत्यांच्या मनात चुकचुकली. पण, विराटने जिगरबाज खेळी केली. फोर, सिक्सने मैदान दणाणून सोडले आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. 18 व्या आणि 19 ओव्हरमध्ये धडाकेबाज खेळी करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर धोणीने अखेरच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेत मॅच विनिंग शॉट लगावत चौकार लगावला. 19.1 ओव्हरमध्ये भारताने 161 धावांचं टार्गेट पूर्ण करत सेमीफायनलमध्ये धडक मारली.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात दमदार राहिली. चौथ्या ओव्हर्सपर्यंत ऑस्ट्रेलियाने पन्नास रन्स पूर्ण केले. पण, पाचव्या ओव्हरमध्ये आशिष नेहराने उस्मान खाव्जाला आऊट करत पहिला धक्का दिला. त्यानंतर आठव्या ओव्हरमध्ये डेव्हिड वार्नरला आर. आश्विनने आऊट करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. नवव्या ओव्हरमध्ये युवराज सिंगने कॅप्टन स्टिव्ह स्मिथला आऊट करत ऑस्ट्रेलियाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, ऑस्ट्रेलियाने धावसंख्येचा आलेख उंचावत ठेवला. तेराव्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने शंभरी गाठली पण तिथेच हार्दिक पांड्याने फिंचला आऊट केलं. फिंचने 43 रन्स करून ऑस्ट्रेलियाचा स्कोर उभारण्यात पायाभरणी केली. त्यानंतर मॅक्सवेलने कमान सांभाळली. ऑस्ट्रेलियाने 15 ओव्हरपर्यंत 130 रन्सचा टप्पा गाठला. जसप्रित ब्रुमराने मॅक्सवेल 31 रन्सवर आऊट करत ऑस्ट्रेलियन बॅटिंगला सुरुंग लावला. तरीही ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीने रन्ससाठी धावधाव कायम ठेवली. हार्दिक पांड्याने अखेरच्या ओव्हरमध्ये फॉल्कनरला आऊट केलं. पण अखेरच्या ओव्हरमध्ये पीटर नेव्हीलने 1 सिक्स आणि एक फोर लगावत ऑस्ट्रेलियाला 160 रन्सचा टप्पा गाठून दिला. निर्धारित 20 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने 160 रन्स पूर्ण करत भारतसमोर 161 धावांचं टार्गेट ठेवलंय. भारतातर्फे हार्दिक पांड्याने 2 विकेट घेतल्या. तर आशिष नेहरा, जसप्रित ब्रुमरा,आर.आश्विन आणि युवराजने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2016 11:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close