S M L

कलिना भूखंड घोटाळ्यात भुजबळांसह 6 जणांवर आरोपपत्र दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Mar 28, 2016 04:44 PM IST

Chhagan-Bhujbal-670x320

मुंबई – 28 मार्च :  माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात मुंबई विद्यापीठाच्या कलिना सेंट्रल लायब्ररीप्रकरणी आज 17 हजार 400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) हे आरोपपत्र आज विशेष कोर्टात दाखल केलं आहे.

भुजबळ यांच्यासह एकून 6 जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून, यात भुजबळ यांचे सीए रविंद्र सावंत यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. याप्रकरणी भुजबळ यांच्यावर 8 जून 2015 रोजी गुन्हा दाखल झाला होता.

काय आहे कलिना भूखंड प्रकरण ?

  • मुंबई विद्यापीठानं दिलेल्या जागेत राज्य सरकार सेंट्रल लायब्ररी उभारणार होती
  • त्यासाठी 18 फेब्रुवारी 1994 रोजी विद्यापीठाने 4 एकर जागाही सरकारला दिली
  • पण नंतर हीच जागा परस्पर खासगी विकासकाला देण्यात आली
  • भूखंड बिल्डरला हस्तांतरित करताना साधं टेंडरही काढण्यात आलं नाही
  • टेंडर न काढल्याने जागा हस्तांतरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरो़प,
  • कलिना भूखंड घोटाळ्याविरोधात लाचलुचपत विभागाकडून आरोप पत्र दाखल
  • आरोप पत्रात भुजबळांचे तत्कालीन सीए रवींद्र सावंतलाही आरोपी केलं
  • भुजबळांसह 6 जणांविरोधात एकूण 17 हजार 400पानांचं आरोप पत्र दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2016 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close