S M L

अनुष्कावर मेसेज करणार्‍यांचा धिक्कार असो, विराट भडकला

Sachin Salve | Updated On: Mar 28, 2016 06:54 PM IST

अनुष्कावर मेसेज करणार्‍यांचा धिक्कार असो, विराट भडकला

28 मार्च : ऑस्ट्रेलियाविरोधात विराट विजयानंतर काही सोशलमीडियाखोरांनी नेहमी प्रमाणे फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सऍपवर अनुष्का शर्मावर मेसेजस केले. यावर विराट कोहली आता चांगलाच संतापला असून त्याने चाहत्यांना चांगलंच फैलावर घेतलं. अनुष्कावर मेसेज्‌स करण्याची आपल्याला लाज वाटते अशा लोकांचा धिक्कार असो अशा शब्दात विराट कोहलीने आपला संताप व्यक्त केला. विराटने याबद्दल ट्विट केलंय.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं प्रेमप्रकरण जग जाहीर आहे. पण, अलीकडे या दोघांच्या प्रेमात मिठ्ठाचा खडा पडला. दोघांनी या प्रेम प्रकरणाला पूर्णविराम दिलाय. टी -20 वर्ल्ड कपच्या न्युझीलंड वगळता प्रत्येक मॅचमध्ये विराटने धडाकेबाज कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाविरोधात सामन्यातही तुफान फटकेबाजी करत भारताला सेमीफायनल गाठून दिली. भारताच्या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा केला गेला. पण, सोशलमीडियावर नेहमीप्रमाणे काही टवळखोरांनी अनुष्का शर्मावर मेसेज्‌स केले. व्हॉट्सऍप, फेसबुक आणि ट्विटरवर अशा मेसेज्‌सचा खच्च पडलाय. अशा या मेसेज्‌समुळे विराट कोहली चांगलाच भडकलाय. त्याने अनुष्काची बाजू घेत चाहत्यांना चांगलंच फटकारून काढलंय. असे मेसेज पाठवणार्‍या व्यक्तींचा धिक्कार असो स्वत:ला सुशिक्षित म्हणवणार्‍या अशा लोकांचा धिक्कार असो अशा शब्दात त्याने चाहत्यांना परखड शब्दात सुनावलं. तसंच अनुष्कानं मला खूप सकारात्मक उर्जा दिली. तीने मला प्रेरित केलं अशी भावनाही व्यक्त केली. विराटने चाहत्यांचा धिक्कार केला असला तरीही काही टवाळखोरांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केलीये.

विराट म्हणतो...,

"असे मेसेज पाठवणार्‍या व्यक्तींचा धिक्कार असो. स्वत:ला सुशिक्षित म्हणवणार्‍या अशा लोकांचा धिक्कार असो.

अनुष्कानं मला खूप सकारात्मक उर्जा दिली. तीने मला प्रेरित केलं."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2016 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close