S M L

पीएचडीचा काळाबाजार करणारे मोकाट, आंदोलक विद्यार्थ्यांवरच गुन्हे दाखल

Sachin Salve | Updated On: Mar 28, 2016 07:33 PM IST

पीएचडीचा काळाबाजार करणारे मोकाट, आंदोलक विद्यार्थ्यांवरच गुन्हे दाखल

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद - 28 मार्च : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाची भावना आहे. याला कारण आहे विद्यापीठातलं पीएचडीचं काळाबाजार प्रकरण...पीएचडी प्रकरणात गाईड डॉ. गीता पाटील यांना वाचवण्यासाठी कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांनी आता दबावतंत्र वापरायला सुरुवात केलं आहे. खरंतर गीता पाटील यांचं निलंबन व्हायला हवंय पण अशी मागणी करणार्‍या विद्यार्थी संघटनांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विविध दलित विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी हातात फलक घेवून पीएचडी पूर्ण करण्यासाठी पैशांची मागणी करणार्‍या गाईड डॉ.गीता पाटील यांच्यावर ते कारवाईची मागणी करतायत. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी कुलगुरूंनी वेळ दिला नाही म्हणून संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मग कुलगुरुंविरोधातही घोषणाबाजी कली. कुलगुरुंनी तरीही विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकण्याऐवजी या 10-15 विद्यार्थ्यांना हुसकावून लावण्यासाठीपोलिसांची फोर्स मागवली. कुलगुरू इतक्यावर थांबले नाहीत तर त्यांनी विद्यार्थ्यांवर चक्क गुन्हे दाखल केले.

आयबीएन लोकमतने पीएचडीचा काळाबाजार उघड केल्यावर रेणुका भावसार यांची गाईडशीप रद्द झाली पण गीता पाटील यांना पाठीशी घातलं जातंय. कुलगुरुंनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. पण पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या गीता पाटील निकटवर्ती समजले जातात. म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाहीये.

आतापर्यंत दोषी गीता पाटील यांना पाठीशी घातलं जात होतं पण आता तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणार्‍या विद्यार्थ्यांवरच गुन्हे दाखल झाल्यानं विद्यार्थी संघटना विथरल्या आहेत. आणि असंतोषाचं वातावरण मराठवाड्‌याच्या बामु विद्यापीठासह अनेक विद्यापीठांमध्ये निर्माण झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2016 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close