S M L

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी 10 दोषी, तिघांची सुटका

Samruddha Bhambure | Updated On: Mar 29, 2016 01:43 PM IST

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी 10 दोषी, तिघांची सुटका

मुंबई – 29 मार्च :  मुंबईत 2002 आणि 2003 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी टाडा न्यायालयानं आज 16 आरोपींपैकी 10 जणांना दोषी ठरवलं आहे. तर, अन्य तिघांची निर्दोष सुटका केली. या प्रकरणी उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

मुंबईत डिसेंबर 2002 आणि 2003च्या मार्च महिन्यात मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले इथे रेल्वे गाड्यांत बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. याप्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली होती. तब्बल 13 वर्षे चाललेला हा खटला निकाली काढताना विशेष टाडा न्यायालयानं 16 आरोपींपैकी 10 जणांना पोटा, शस्त्रास्त्र कायदा आणि रेल्वे कायद्यांतर्गत दोषी ठरवलं. तर, तिघांची पुरेशा पुराव्यांअभावी सुटका केली. दोन आरोपींचा आधीच मृत्यू झालाय, तर एका आरोपीला या प्रकरणातून डिस्चार्ज अर्थात काढून टाकण्यात आलं आहे. दोषींमध्ये साकीब नाचन, फरहान मवीक, आतीफ, डै अन्सारी, नूर अली, नूर मोहम्मद, नासीर मुल्ला, गुलाम अकबर, मुजम्मील, नसीर यांचा समावेश आहे.

नेमके कुठे झाले होते बॉम्बस्फोट?

6 डिसेंबर 2002 : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात स्फोट, 22 जण जखमी

27 जानेवारी 2003 : विले पार्ले (पूर्व) बाजारात स्फोट, 30 जण जखमी

13 मार्च 2003 : मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ लोकलमध्ये स्फोट, 10 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2016 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close