S M L

इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचा अपहरणकर्ता अटकेत, सर्व प्रवासी सुखरुप

Samruddha Bhambure | Updated On: Mar 29, 2016 07:24 PM IST

इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचा अपहरणकर्ता अटकेत, सर्व प्रवासी सुखरुप

CetzmXPW8AE4jMY

29 मार्च :  इजिप्त एअरलाईन्स विमानाच्या अपहरणनाट्यानंतर सर्व प्रवाश्यांची सुखरुप सुटका केल्यानंतर अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली आहे. सायप्रस सरकारने ट्विटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

एअरबस एमएस 181 या विमानात सात क्रू मेंबर्ससह 55 प्रवासी होते. अपहरण केल्यानंतर सायप्रस सरकारने बातचीत करण्याचा प्रस्ताव दिला होता. यानंतर अपहकर्त्याने केबिन क्रू आणि4परदेशी नागरिक वगळता सर्व प्रवाशांची सुटका केली होती.

अपहरणकर्त्याचं नाव सैफ अलदीन मुस्तफा असं आहे. याआधी त्याचं नाव इब्राहिम समाहा असल्याचं सांगितलं जात होतं. 27 वर्षीय सैफ अलदीन मुस्तफा इजिप्तचा रहिवासी आहे. सायप्रसमध्ये असलेल्या पत्नीला पत्र पोहोचवण्यासाठी त्याने विमानाचं अपहरण केलं होतं.

हे विमान अलेक्झांड्रियावरुन इजिप्तची राजधानी कैरोला जात होतं. त्याचवेळी विमानाचं अपहरण करण्यात आलं. अपहरणानंतर विमान सायप्रसच्या अर्नाख एअरपोर्टवर उतरवण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2016 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close