S M L

इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दिलासा

19 मार्च राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने महाराष्ट्रातील इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सीईटी दिल्यानंतर जे विद्यार्थी कॅप म्हणजेच केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या माध्यमातून प्रवेश घेतील त्यांना जन्मत: किंवा 15 वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला म्हणजेच डोमिसाईल सर्टिफीकेट द्यावे लागणार आहे. तसेच शिक्षणासाठी महाराष्ट्रात राहू इच्छितो किंवा भविष्यात महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहण्याचा इरादा आहे, अशा पद्धतीची कुठलीही तात्पुरती प्रमाणपत्रे यापुढे इंजीनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी स्वीकारली जाणार नाहीत. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे मॅनेजमेंट सीटव्यतिरिक्तच्या सर्व जागांवर महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रवेशास पात्र राहतील. ज्यांच्याकडे डोमिसाईल नसेल अशा विद्यार्थ्यांना मात्र यापुढे इंजीनिअरिंगच्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये प्रवेश घ्यावा लागेल. अशाच स्वरूपाचा निर्णय एमबीए प्रवेशासाठीसुद्धा येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2010 10:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2010 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close