S M L

ठाण्यात इंग्लंड-श्रीलंका मॅचवर सट्टेबाजी, 4 बुकींना अटक

Sachin Salve | Updated On: Mar 30, 2016 08:45 AM IST

ठाण्यात इंग्लंड-श्रीलंका मॅचवर सट्टेबाजी, 4 बुकींना अटक

ठाणे - 30 मार्च : इंग्लंड- श्रीलंका सामन्यादरम्यान सट्टा घेणार्‍या 4 बुकींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. 26 तारखेच्या सामन्यादरम्यान सट्टा घेत असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरल्या हावरे सिटीमधल्या एका फ्लॅटवर धाड टाकून ही कारवाई केलीय. आरोपींकडून 12 मोबाईल आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आलाय.

क्रिकेट विश्वचषक सुरु असला कि सट्टेबाज मोठ्या प्रमाणावर सक्रीय होतात. त्यात देखील सध्या सुरू असलेल्या टी- 20 विश्वचषक वर मोठ्या प्रमाणावर बेटिंग सुरू असल्याची टीप ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्या अनुषंगाने तपास करत पोलिसांनी घोडबंदर रोडवरील हावरे सिटीमधील एका फ्लॅट वर धाड टाकून मोठे रॅकेट उद्‌ध्वस्त केलं. 26 मार्च रोजी होत असलेल्या इंग्लंड श्रीलंका सामन्यावर हा सट्टा लावला जात असल्याची पोलिसांना मिळाली होती. सदर धाडीत कुख्यात बुकी प्रवीण बेरा हा मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. तर परंतु त्याचे चार साथीदार मात्र अटक झाले. संजय मनसुखलाल राधवाणी, प्रतिक मेघाजी राधवाणी, जगदीश पटेल आणि अरविंद अग्रहारी या चौघा बुकींना बेट घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले तर मुंबईचा कुख्यात बुकी प्रवीण बेरा उर्फ पी डी आणि निकुंज ठाकूर हे फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून बेटिंग घेण्यासाठी वापरण्यात येणारे 12 मोबाईल, 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2016 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close