S M L

भाजपमध्ये ज्यांना किंमत नाही तेच देवनारवर बोलतायत, कदमांचा सोमय्यांना टोला

Sachin Salve | Updated On: Mar 30, 2016 09:55 AM IST

kadam_somiya3मुंबई - 30 मार्च : देवनार प्रकरणावरून सेना-भाजपमधला वाद चिघळला आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर रामदास कदम यांनी पुन्हा भाजपवर तोफ डागली आहे. कचर्‍यांचं कंत्राट संपल्यानंतर कशी काय आग लागते असा प्रश्न राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित केला. ज्यांना भाजपमध्ये किंमत नाही तेच यावर बोलतायत असं वक्तव्य त्यांनी केलं. सोमय्यांचं नाव न घेता रामदास कदम यांनी त्यांना टोला लगावला. गेलीये असा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलाय.

मुंबईतल्या देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये वारंवार लागणार्‍या आगीच्या मुद्द्यावरून आता सेना आणि भाजपमधला वाद चांगलाच चिघळलाय.देवनार आगीत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तसंच देवनार डेपो बंद करा अशी मागणीही त्यांनी केली होती. सोमय्यांच्या आरोपामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडलीये. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत कोणी तरी ही आग लावली, कचर्‍यांचं कंत्राट संपल्यानंतर कशी काय आग लागते असा प्रश्न रामदास कदम यांनी उपस्थिती केला. आमच्यावर आरोप करणार्‍यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे असा पलटवार कदम यांनी केलाय. तसंच ज्यांना किंमत नाही असे नेते आरोप करत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2016 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close