S M L

नाशिकमध्ये किसान सभेचा महामुक्काम सत्याग्रह, आंदोलक शेतकरी रात्रभर झोपले रस्त्यावरच

Sachin Salve | Updated On: Mar 30, 2016 12:20 PM IST

नाशिकमध्ये किसान सभेचा महामुक्काम सत्याग्रह, आंदोलक शेतकरी रात्रभर झोपले रस्त्यावरच

नाशिक - 30 मार्च : नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेनं महामुक्काम सत्याग्रह केला आहे. त्यामध्ये आदिवासी शेतकरी मोठ्‌या संख्येने सामील झाले आहे. या आंदोलक शेतकर्‍यांनी कालची रात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या रस्त्यावर झोपून काढली.

मोठ्या प्रमाणात शेतकरी आल्यामुळे नाशिकचे रस्ते, सीबीएस बसस्थानक जाम झालंय. अशोक स्तंभ ते जिल्हा परिषद सिग्नलपर्यंतचा दीड किलोमीटर रस्ता बंद करण्यात आलाय. दुष्काळ गारपीट आणि अवकाळी पाऊस या सारख्या नैसर्गिक संकटांनी शेतकरी उद्‌ध्वस्त झालेत. त्यांना सरकारनं वार्‍यावर सोडल्याचा आरोपही किसान सभेनं केला आहे.

राज्यातील आणि केंद्रातील सरकार मात्र घोषणा पलीकडे काहीच करायला तयार नाही. अशा परिस्थितीत निर्णायकपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकर्‍यांकडे दुसरा कोणताच मार्ग शिल्लक राहिलेला नाही म्हणून हा बेमुदत महामुक्काम सत्याग्रह असल्साचा दावा किसान सभा करतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2016 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close