S M L

बबनराव पाचपुते अडचणीत, बँकेकडून मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू

Sachin Salve | Updated On: Mar 30, 2016 03:20 PM IST

 babanrao pachapute44

अहमदनगर - 30 मार्च : भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते अडचणीत आले आहे. पंजाब नॅशनल बँकेने त्यांची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे. पंजाब नॅशनल बँकेनं मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू केलीये. तसंच ऍक्सिस बँकेनंही वसुलीची नोटीस बजावलीये.

बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रमसिह पाचपुते अध्यक्ष असलेल्या साईकृपा फेज 2 या खाजगी साखर कारखान्यासाठी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून 287 कोटी 60 लाख 38 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण कारखाना डबघाईला आल्याने हे कर्ज आपण फेडू शकत नाही असं पाचपुतेंनी सांगितलं होतं. अखेर बँकेने पाचपुतेंच्या संपत्तीची जप्ती करण्याची कारवाई सुरू केली आहे. शिवाय पाचपुतेंनी ऍक्सिस बँकेकडूनही 13 कोटी 20 लाखांचं कर्ज घेतलं होतं. या बँकेनेही बबनराव पाचपुतेंना वसुलीची नोटीस बजावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2016 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close