S M L

भुजबळ कुटुंबिय अडचणीत, ईडीकडून 11 हजार पानाचं आरोपपत्र दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Mar 30, 2016 08:08 PM IST

 sameer_And_chagan_bhujbal

मुंबई - 30 मार्च :  छगन भुजबळ यांच्यासह 52 जणांच्या विरोधात 11 हजार 428 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. मनी लाँड्रिंग कायद्याखाली ईडीने आज मुंबई सेशन कोर्टातील विशेष इडी कोर्टा हे आरोपपत्र दाखल केलं.

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासह पंकज भुजबळांनाही इडीने आरोपी केल्याचे इडीच्या सूत्रांनी सांगितलं. तर, कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इतर जणांवर ईडीने आरोपपत्रात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप ठेवला आहे. या आरोपपत्रामध्ये 30 साक्षीदारांच्या साक्षी आहे.

दरम्यान, नुकतंच कलिना भूखंड घोटाळाप्रकरणात लाचलुचपत विभागानेही भुजबळांविरोधात 17 हजार 400 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2016 08:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close