S M L

भुजबळांची कोठडी आज संपणार, जामीन की पुन्हा कोठडी ?

Sachin Salve | Updated On: Mar 31, 2016 09:28 AM IST

bhujbal434मुंबई - 31 मार्च : मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची ईडी कोठडीची मुदत आज संपतेय. त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे भुजबळांना आज जामीन मिळतो की कोठडी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर ईडीने 14 मार्च रोजी छगन भुजबळ यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीनंतर भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांची कोठडी देण्यात आली होती. दोन दिवसांच्या कोठडीनंतर कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती.

या चौकशी दरम्यान, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. आज भुजबळांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. छगन भुजबळांचे वकील आज जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळं न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्यासह 52 जणांवर मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने काल आरोपपत्र दाखल केलं. सेशन कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रामध्ये 30 साक्षीदारांच्या साक्षी आहेत. एकूण 11 हजार 428 पानांचं आरोपपत्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2016 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close