S M L

मोखाबर्डी सिंचन घोटाळ्याप्रकरणी दुसरा एफआयआर दाखल

Sachin Salve | Updated On: Mar 31, 2016 12:04 PM IST

मोखाबर्डी सिंचन घोटाळ्याप्रकरणी दुसरा एफआयआर दाखल

नागपूर - 31 मार्च : राज्यात झालेल्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने दुसरा एफआयआर नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील कालव्याच्या कामात कंत्राटदार आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने झालेल्या या घोटाळ्याप्रकरणी विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे तीन अधिकार्‍यांचे नावे आहेत. या अधिकार्‍यांशिवाय हे काम करणार्‍या कंत्राट घेणार्‍या कंपनीचे सहा संचालकांची नावेही आहेत. टेंडर प्रक्रियेमध्ये आर जे शहा आणि कंपनी तसंच डी ठक्कर कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना फायदा पोहचवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कारवाई झालेल्या अधिकार्‍यांमध्ये सोपान रामराव सुर्यवंशी सेवानिवृत्त मुख्य अभियंता, सध्या राहणार औरंगाबाद, उमाशंकर पर्वते सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गोसेखुर्द डावा कालवा, चंदन जिभकाटे, वरिष्ठ लेखाधिकारी, विदर्भ सिंचन विकास महामंडळ यांचा समावेश आहे. कंत्राट घेणार्‍या कंपनीचे संचालक कालिंदी शहा, तेजस्विनी शहा, विशाल ठक्कर, प्रवीण ठक्कर, जिगर ठक्कर, अरुण कुमार गुप्ता यांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींच्या नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई येथील घरीही छापे मारण्यात आले आहेत.

(संग्रहीत छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2016 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close