S M L

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला मुहूर्त कधी?

अद्वैत मेहता, विनोद तळेकर 19 मार्चबहुचर्चित अशा अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला या अधिवेशनातही मुहूर्त सापडणार नसल्याचे दिसत आहे. सरकारचे दोन मंत्री या विधेयकाबद्दल परस्पर विरोधी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे या विधेयकाचे नेमके काय होणार याचा अंदाज कोणालाही येत नाही.बरीच वर्ष रखडलेले अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक या अधिवेशनातही मांडले जाण्याची शक्यता कमी आहे. हे विधेयक खरे तर 2005 मध्ये विधानसभेत मंजूर झाले होते. पण विधानपरिषदेत शिवसेना भाजप आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे हे विधेयक प्रलंबितच राहिले होते. त्यानंतर संयुक्त चिकित्सा समितीने या विधेयकाबद्दल वेळेत अहवाल सादर न केल्याने या विधेयकाला मुहूर्तच मिळत नव्हता. पण सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी नुकतीच याबाबत एक बैठक घेऊन हे विधेयक नव्याने विधीमंडळात मांडण्यात येईल, असे आश्वासन अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील नेत्यांना दिले.पण याबाबत संसदीय कामकाज मंत्री मात्र वेगळीच माहिती देतायत.हे विधेयक जेव्हा जेव्हा मांडले गेले त्यावेळी पुढारलेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनीच या विधेयकाला विरोध केला. त्यामुळे हे विधेयक मंजूर करायला खरेच तांत्रिक अडचणी येत आहेत की बुवा आणि बाबांना श्रद्धास्थानी मानणार्‍या नेत्यांनाच हे विधेयक नको असा प्रश्न आहे. आणि मंत्र्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे सरकारच्या या विधेयकाबाबतच्या उदासिनतेला पुष्टीच मिळत आहे.हे विधेयक जर मंजूर झाले तर अंधश्रद्धा बाळगणे आणि ती वाढवण्यास मदत करणार्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहावे लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2010 11:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2010 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close