S M L

नाशिकमध्ये धरणं गाठताहेत तळ, 5 धरणांमधील पाणीसाठा 10 टक्क्यांच्या खाली

Sachin Salve | Updated On: Apr 1, 2016 11:01 AM IST

 नाशिकमध्ये धरणं गाठताहेत तळ, 5 धरणांमधील पाणीसाठा 10 टक्क्यांच्या खाली

नाशिक -01 एप्रिल : जिह्यातील धरणं तळ गाठत असून, पुढील महिन्यापासूनच पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच भीषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील चार धरणं कोरडी पडली आहेत. तर अन्य पाच धरणांमधील पाणीसाठाही 10 टक्क्यांच्या खाली गेला आहे. येत्या 15 दिवसांत या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठाही शुन्यावर जाण्याची शक्यता आहे.

मान्सूनने यंदा जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने बहुतांश धरणे पूर्ण भरू शकलेली नाहीत. अनेक धरणे 50 टक्क्यांहूनही कमी भरली. अशा परिस्थितीतही प्रशासनाने जिल्हावासियांना पाणी वाटपाचे नियोजन केलं. परंतु, जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. आजमितीस गंगापूर धरणामध्ये 23टक्के एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा तो निम्म्याहून कमी असल्याने पाणी वापराबाबत काटकसरीचे धोरण अवलंबिल्याशिवाय गत्यंतर राहिलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2016 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close