S M L

कर वसुली अधिकार्‍याची दबंगगिरी,रिव्हॉल्व्हर डोक्याला लावून धमकावलं

Sachin Salve | Updated On: Apr 1, 2016 11:14 AM IST

कर वसुली अधिकार्‍याची दबंगगिरी,रिव्हॉल्व्हर डोक्याला लावून धमकावलं

औरंगाबाद -01 एप्रिल : महानगर पालिकेच्या कर वसुली अधिकार्‍याची दबंगगिरी सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झालीये. या कर वसुली अधिकार्‍यानं एका हॉटेलमालकाला चक्क रिव्हॉल्व्हर डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिल्यानं शहरात खळबळ माजली आहे. या दबंग अधिकार्‍याचं नाव आहे विठ्ठल डाके.

प्लाटिनम इन या सिडकोतील हॉटेलवर थकबाकी होती. ती वसूल करण्यासाठी डाके आपल्या पथकासोबत हॉटेलवर पोहचले.त्यांनी हॉटेल सील करण्यास सुरूवात केली. हॉटेल मालक हरीश पवार यांनी त्यांना नोटीस न देता कसं काय सील करता असा जाब विचारला. त्यामुळं डाके यांना राग आला आणि त्यांनी चक्क हरीश पवार यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावलं. तिथे असलेले इतर लोकं मध्ये पडले नसतं तर काय घडले सांगता येत नाही. मात्र, डाकेंच्या विरोधात आता सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता मनपा आयुक्त याबाबत काय भूमिका घेतात याकडे शहराचं लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2016 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close