S M L

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमाची पताका

19 मार्चआज 56व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण दिल्लीच्या विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते झाले.या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमाची पताका उंचावलेली दिसत होती. जोगवासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून उपेंद्र लिमयेला पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा, सर्वोत्कृष्ट संगीत, पार्श्वगायक आणि गायिका असे पाच पुरस्कार जोगवा सिनेमाने पटकावले. तर सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून हरिश्चंद्राची फॅक्टरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.गंध सिनेमाने पटकथेसाठी आणि ऑडिओग्राफीसाठी पुरस्कार मिळवला. वळू आणि विहीरफेम उमेश कुलकर्णीला त्याच्या थ्री ऑफ अस या डॉक्युमेंट्रीसाठी पुरस्कार मिळाला. एकूणच मराठी सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. त्याबरोबर प्रियांका चोप्राला फॅशन सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि त्याच सिनेमासाठी कंगना राणावतला सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर सहाय्यक अभिनेता म्हणून अर्जुन रामपालने पुरस्कार स्वीकारला. फाळके पुरस्कार व्ही. के. मूर्ती यांना या वेळी सर्वोत्कृष्ट असा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ती यांना देण्यात आला. अनेक वर्षे हिंदी फिल्म इंड्स्ट्रीत सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी काम केले आहे. गुरुदत्तच्या अनेक क्लासिक सिनेमांची सिनेमॅटोग्राफी त्यांनी केली. प्यासा, सीआयडी, साहेब,बिबी और गुलाम, आरपार अशाअनेक सिनेमांसाठी त्यांचे योगदान आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2010 02:24 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2010 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close