S M L

आम्हाला थोडा वेळ द्या !, शनी शिंगणापूर देवस्थानचं अजूनही तळ्यातमळ्यात

Sachin Salve | Updated On: Apr 2, 2016 01:42 PM IST

आम्हाला थोडा वेळ द्या !, शनी शिंगणापूर देवस्थानचं अजूनही तळ्यातमळ्यात

02 एप्रिल : हायकोर्टाच्या निर्णयानंतर शिंगणापुरातील महिला प्रवेशबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. या निर्णयाचं शिंगणापूर देवस्थानने प्रथमच जाहीर स्वागत केलंय. पण, हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत हाती आल्यानंतरच आणि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधी निर्णय घेऊ, अशी भूमिका शिंगणापूर देवस्थान घेतली आहे. आम्हाला थोडा वेळ द्या, अशी विनंतीही देवस्थानने केली आहे. याच विनंतीला मान देऊन राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज शिंगणापूरला जाण्याचा बेत रद्द केलाय.

शनी शिंगणापूरच्या शनी मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होतीय. त्यांच्या या लढ्याला अखेर यश मिळाले. महाराष्ट्र हिंदू पूजा कायदा 1956 नुसार मंदिरात पुजेचा सर्वांना अधिकार आहे. या कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. कोर्टाच्या या आदेशामुळे मंदिराचे द्वार उघडले गेले आहे.

अखेर कोर्टाच्या आदेशापुढे शनी शिंगणापूर देवस्थानने नमती भूमिका घेतलीये. हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत हाती आल्यानंतरच आणि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधी निर्णय घेऊ, अशी भूमिका शिंगणापूर देवस्थान घेतली आहे.

पण दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात देवस्थान बचाव समिती सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. काल अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या उपस्थितीत रात्री महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला शनी संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, सरपंच, पोलीस अधीक्षक आणि देवस्थान कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी न्यायालय आणि सरकारच्या भूमिकेवर चर्चा झाली. न्यायालयाची प्रत आल्यानंतर काय उपाययोजना करायच्या यावरही चर्चा झाली. त्याचबरोबर कायदा- सुव्यवस्थेचाही आढावा घेण्यात आलाय .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2016 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close