S M L

भाजप शिवसेनेला संपवायला निघाल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप - सूत्र

Samruddha Bhambure | Updated On: Apr 3, 2016 08:29 PM IST

uddhav on MeatBan

मुंबई - 03 एप्रिल :  भाजप शिवसेनेला संपवायला निघाल्याचा थेट आरोप शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या विधानसभेत पराभूत झालेल्या सर्व शिवसेना उमेदवारांची आज शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते, मंत्री, जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या पुढच्या वाटचालीबाबत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सूचना केल्याची माहिती आहे.

जनतेसाठी आपण भाजपसोबत आलो, मात्र तोच भाजप आता शिवसेना संपवायला निघाल्याचा अरोप या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केला, असं सुत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला एकटं लढायचं, सत्तेत असलो तरी जनतेसाठी रस्त्यांवर उतरायचं अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2016 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close