S M L

'बेस्ट' इंडीजने दुसऱ्यांदा जिंकला टी-२० वर्ल्ड कप

Samruddha Bhambure | Updated On: Apr 3, 2016 11:46 PM IST

'बेस्ट' इंडीजने दुसऱ्यांदा जिंकला टी-२० वर्ल्ड कप

 

03 एप्रिल :  सिक्स...सिक्स...सिक्स आणि आणखी एक सिक्स लगावत विंडीजने इंग्लंडला हरवून टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलंय. ब्राथवेटने लगावले सिक्स आणि सम्युल्सच्या धडाकेबाज खेळीने दुसर्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकलाय.

ईडन गार्डनवर यंदाच्या वर्ल्डकप टी- 20च्या फायनल मॅचमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिजला 156 रन्सचं आव्हान दिलं होतं ते विंडीजने अखेरच्या ओव्हरमध्ये १६१ रन्स पूर्ण करत जिंकून दाखवलं. त्याधी

विंडीजने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय

घेतला. दरम्यान, फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात सुमार झाली. पण, मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरला. त्यामुळे 20 ओव्हर्समध्ये 155 धावांपर्यंत इंग्लंडला मजल मारता आली. जो रूट (54) याने सर्वाधिक रन्स केल्या आहेत.

इंग्लडचा जेसन रॉय (0) पहिल्या ओव्हर्सच्या दुसर्‍याच बॉलवर आऊट झाला. त्या पाठोपाठ अलेक्सही (1) आऊट झाला. कॅप्टन मोर्गन (5) हा चौथ्या ओव्हसवर आऊट झाला तर जोस बटलर (36) 12 व्या ओव्हरला आऊट झाला. स्टोक 13 रन्सवर आऊट झाला तर जो रूट 54 रन्सवर आऊट झाला.

.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2016 11:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close