S M L

दूधभेसळ करणारी टोळी पकडली

20 मार्चमुंबईतील दहिसर भागातील पंचशीलनगर झोपडपट्टीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धाड टाकून दुधात भेसळ करणार्‍या टोळीला अटक केली आहे. यामध्ये 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास 1 हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. अमूल, गोकु ळ, महानंदा यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या दुधामध्ये ही भेसळ केली जात होती. भेसळ करणार्‍या लोकांकडून इतर दूध कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. एका लीटरच्या पिशवीतून जवळपास 100 मिलीलिटर दूध काढले जात होते. आणि नंतर त्या पिशवीमध्ये पाणी भरले जात होते. दहिसरसोबतच पोईसर, शिवाजीनगर आणि बोरिवली वेस्टमध्येही एफडीआयने ही धडक कारवाई केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2010 09:32 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2010 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close