S M L

दुष्काळाचं दुष्टचक्र, चक्क पाण्याच्या टाक्यांवर पोलिसांचा पहारा

Sachin Salve | Updated On: Apr 4, 2016 06:26 PM IST

दुष्काळाचं दुष्टचक्र, चक्क पाण्याच्या टाक्यांवर पोलिसांचा पहारा

लातूर - 04 एप्रिल : पाणी टंचाईमुळे हैराण असलेल्या लातूरच्या नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. पाण्याच्या टाकीवर टँकरसाठी होणारे तंटे आणि भांडणात देखील वाढ झाल्यानं पाण्याच्या टाकी परिसरात पोलिसांचा खडा पहारा देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. त्यानुसार आजपासून लातूर शहरातल्या पाण्याच्या टाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्यामुळे आता पोलिसांचा पाण्यावर पहारा असणार आहे.

एरवी मोठ्या मोठ्या गुन्ह्याचा तपास करणारे तसंच मोठ्या मंत्र्यांच्या सुरक्षेची जाबाबदारी पार पाडणारे हे पोलीस सध्या पाण्याला सुरक्षा देतायेत. लातुरात पाण्यासाठी होणार्‍या संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत चाललीय. पाण्यावाचून चिडलेल्या लोकांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन आपला रोष व्यक्त करणं सुरू केल्यानं जिल्हाधिकार्‍यांनी यापूर्वी पाण्याच्या टाकीच्या परिसरात कलम 144 देखील लागू केलं होतं. या कलमाची मुदत 1 एप्रिल रोजी संपल्यानं गेल्या दोन दिवसांत लोकांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन गोंधळ घालण्याचा प्रकार सुरू केला. त्यामुळे या गोंधळात मोठी घटना घडू नये आणि लोकांमध्ये भांडण होऊ नये यासाठी लातूरच्या पोलिसांनी पाण्याच्या टाकीच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय. याशिवाय पेट्रोलिंगवर गस्त घालणार्‍या पथकालाही पाण्याच्या टाकीच्या परिसरात गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2016 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close