S M L

तात्याराव लहानेंवर कारवाईचे विनोद तावडेंनी दिले संकेत

Sachin Salve | Updated On: Apr 5, 2016 08:01 PM IST

तात्याराव लहानेंवर कारवाईचे विनोद तावडेंनी दिले संकेत

मुंबई - 05 एप्रिल : मुंबईतील प्रसिद्ध जे.जे. हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी आहेत, त्याची निवृत्त न्यायाधिकाशांच्या मार्फत चौकशी करून कारवाई केली जाईल असं वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितलं. रूग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी मार्डच्या डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत असंही तावडे यांनी सांगितलं. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मार्डचा संप मिटावा अशी मागणी सभागृहात केली होती.

मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी, रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरोधात तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपाचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला असून रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. हा संप तातडीने मिटवण्यासाठी सरकारने त्वरीत पावलं उचलावीत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केली. मुंडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्याची उपसभापतींनी गंभीर दखल घेतली. आणि संप आजच्या आज मिटवा, असे निर्देशही सरकारला दिले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामागे एक वेगळे षडयंत्र असल्याचे दिसते असा आरोपही मुंडे यांनी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2016 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close