S M L

मुंबईकरांच्या एसी लोकलचं दगडफेकीने स्वागत

Sachin Salve | Updated On: Apr 5, 2016 09:05 PM IST

मुंबईकरांच्या एसी लोकलचं दगडफेकीने स्वागत

मुंबई - 05 एप्रिल : मुंबईकरांची घामांच्या धारातून सुटका करण्यासाठी गारेगार एसी लोकल अखेर मुंबईत दाखल झालीये. पण, दाखल होताच मुंबईच्या या 'गारेगार राणी'ला कुणाची तरी नजर लागलीये. एसी लोकलवर कुणी तरी अज्ञात व्यक्तीने दगडफेक केलीये. त्यामुळे लोकलच्या एका डब्ब्यातील काचेला तडे गेले आहे.

मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली एसी लोकल सोमवारी रात्री मुंबईत दाखल झाली.. चेन्नईहून मुंबईत आलेली ही एसी लोकल ट्रेन कुर्ला कार शेड इथं आणण्यात आली. 12 डब्याची ही लोकल 16 एप्रिलपासून चाचणीसाठी ट्रॅकवर उतरणार आहे. चेन्नईतल्या ICF म्हणजेच इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत ही पहिली एसी लोकल तयार करण्यात आलीये. आधुनिक सेवा सुविधा असलेली ही देशातील पहिली 12 डब्यांची AC लोकल आहे. ट्रेनच्या प्रत्येक डब्यांत 15 टनचा एक एसी बसवण्यात आलाय. प्रत्येक डब्याला आटोमॅटिक दरवाजे आहेत. याचं नियंत्रण मोटरमन करेल. पण, अशा या अत्याधुनिक एसी लोकलचं अज्ञाताने दगड मारून स्वागत केलंय.

अज्ञात व्यक्तीने एसी लोकलवर दगडफेक केलीये. त्यामुळे लोकलच्या एका डब्ब्यावर काचेला तडे गेले आहे. चेन्नईहून ते मुंबई या प्रवासात ट्रेनची एक काच फुटल्याचं लक्षातआल्यानं त्याच्या दुरूस्तीचंही काम सुरू आहे. काही तांत्रिक कामं पूर्ण करण्यात येत असून त्यानंतर सुरक्षा चाचण्यांना सुरूवात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2016 09:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close