S M L

... तर सीलिंग फॅनवर बंदी घाला - राखी सावंत

Samruddha Bhambure | Updated On: Apr 6, 2016 01:37 PM IST

... तर सीलिंग फॅनवर बंदी घाला - राखी सावंत

मुंबई – 06 एप्रिल : प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपवल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अनेकजण प्रत्युषाच्या मृत्यूबद्दल हळहळ, दु:ख व्यक्त करत असताना अभिनेत्री राखी सावंतने सीलिंग फॅनवर बंदी घालण्याची अजब मागणी केली आहे.

भारत माता की जय म्हणण्यापेक्षाही आज मुलींच्या आत्महत्या हा प्रश्न जास्त गंभीर आहे. तुम्ही तुमच्या मुली, बहिणीवर प्रेम करता तर, सीलिंग फॅनचा वापर बंद करा. सीलिंग फॅन काढून टाका आणि टेबल फॅन किंवा एसी वापरा अशी मागणी राखी सावंतने केली. याबाबत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्येक घरातून सीलिंग फॅन हद्दपार करण्याची विनंती केली आहे.

राखीने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी तिने प्रत्युषाच्या आईवडिलांना 5 कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी केली.

जे पालक आपल्या मुलींवर प्रेम करतात त्यांनी कृपया घरातील सिलींग फॅन काढून ठेवावा. प्रत्युषा बॅनर्जीला तिचा बॉयफ्रेंड हा मानसिकरित्या त्रास देत होता. याबाबत त्याला आपण अनेकवेळा समजावलेही होते, असंही राखीने सांगितलं.

दरम्यान, राखी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येचा वापर करुन घेत असल्याबद्दलही तिच्यावर टीका होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2016 08:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close