S M L

लोकांना इथं प्यायला पाणी नाही, मग IPL राज्याबाहेर का हलवू नये? -कोर्ट

Sachin Salve | Updated On: Apr 6, 2016 05:34 PM IST

लोकांना इथं प्यायला पाणी नाही, मग IPL राज्याबाहेर का हलवू नये? -कोर्ट

मुंबई - 06 एप्रिल : राज्यात आधीच दुष्काळ परिस्थिती असताना आयपीएलसाठी पाणी वाया का घालवायचे ?, लोकांपेक्षा आयपीएल

महत्त्वाचे आहे का ? असा सवाल करत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकार आणि एमसीएला फटकारलंय. दुष्काळाच्या परिस्थितीत आयपीएलचे सामने राज्याबाहेर का खेळवू नये असा सवालही कोर्टाने विचारलाय.

आयपीएल क्रिकेट स्पर्धा शनिवारपासून सुरू होत आहेत. मात्र, त्यापूर्वी मुंबई हायकोर्टामध्ये यासंबंधी 2 याचिका दाखल झाल्या आहेत. आयपीएल मॅचेसदरम्यान, मुंबई, पुणे आणि नागपूरच्या स्टेडियमवर खेळपट्‌ट्यांची निगा राखण्यासाठी 60 लाख लीटर पाण्याचा वापर करण्यात येतो. त्याविरोधात केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ने कोर्टात माहिती दिली की, फक्त मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन महिन्यात कमीत कमी 40 लाख लीटर पाण्याचा वापर केला जाईल. तर याचिकाकर्त्यांनी लातूरमध्ये भीषण पाणीटंचाई आहे आणि हे सगळ्यांना माहित आहे. अशा परिस्थिती आयपीएलच्या सामन्यांसाठी 1 कोटी 20 लाख वापरलं जाणार आहे. यावर एमसीएने पिण्याचं पाणी हे बाहेरून मागवण्यात येतं असं उत्तर दिलं. पण, कोर्टाने जेव्हा इतर पाणी कुठे आणलं असा सवाल केला असता यावर एमसीएने कोणतही उत्तर दिलं नाही.

हायकोर्टाने दुष्काळाचं गांभीर्य पाहात राज्य सरकार आणि एमसीएवर ताशेरे ओढले. राज्यात दुष्काळामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. अशा परिस्थितीत आयपीएलसाठी पाणी वाया घालवू शकत नाही. लोकांना दोन ते तीन दिवसांनी पाणी मिळत नाही असं असताना आयपीएलसाठी पाणी वाया का घालवायचे ?, लोकांपेक्षा आयपीएल महत्त्वाचे आहे का ? असा सवालच कोर्टाने विचारला.

तसंच या परिस्थिती आयपीएलचे सामने राज्यबाहेर का खेळवले जाऊ नये असा सल्लाही दिला. एमसीए आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनला याचिकेवर उत्तर देण्याची सुचना करण्यात आली असून उद्या पुन्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे.येत्या शनिवारपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवले जातील अशी शक्यता नाकारला नाही. राज्यात मुंबई,पुणे आणि नागपूरमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2016 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close