S M L

सदनाबाहेर या दाखवतो, भरसभागृहात दिलीप कांबळेंची आमदाराला धमकी

Sachin Salve | Updated On: Apr 7, 2016 05:47 PM IST

सदनाबाहेर या दाखवतो, भरसभागृहात दिलीप कांबळेंची आमदाराला धमकी

मुंबई - 07 एप्रिल : सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्या विधानावरून विधानपरिषदेत अभूतपूर्व गोंधळ झाला. सदनाच्या बाहेर या तुम्हाला दाखवतो अशी धमकीच दिलीप कांबळे यांनी आमदार अमरसिंह पंडित यांना दिली. दिलीप कांबळे यांच्या या उत्तरामुळे विरोधकांनी एकच गोंधळ घालत कांबळेंनी माफी मागावी अशी मागणी केली. खुद्द विधानसभा सभापतींनी हा प्रकार दुदैर्वी असल्याचं सांगत सभागृहाच्या पटलावरून हा मुद्दा खोडून काढलाय.

बीड जिल्ह्यातील रेवकी नावाचं गाव आहे. या गावातील शाळेतील दोन मुलींना शिष्यवृत्ती देण्याबाबत अमरसिंग पंडित यांनी प्रश्न

उपस्थितीत केला होता. या दोन मुलींसह शाळेतील इतर मुलींनाही शिष्यवृत्ती देण्यात आली नाही असा अहवाल आयुक्तांनी दिला होता. या अहवालानंतर या मुलींना शिष्यवृत्ती दिली गेली पण या प्रकरणी सरकारने आपली भूमिका मांडावी अशी मागणी पंडित यांनी केली होती.

यावर उत्तर देतांना दिलीप कांबळे यांचा तोल ढळला. तुम्ही दमबाजी करत असाल तर सदनाच्या बाहेर या तुम्हाला दाखवतो अशी धमकीच दिलीप कांबळेंनी आमदार अमरसिंह पंडितांना दिली.

कांबळेंच्या या विधानामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला. या विधानावर दिलीप कांबळे यांनी सभागृहाची माफी मागावी अन्यथा कामकाज चालू देणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिली. जी घटना घडली ती दुदैर्वी आहे. सभागृहाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय. मंत्री दिलीप कांबळे यांनी सभागृहची माफी मागावी. मी हे पटलावरून काढून टाकतो अशा शब्दात सभापतींनी स्पष्ट केलं आणि 4 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब केलं.

दरम्यान, या प्रकरणी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलगिरी व्यक्त केली. असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ अशी सारवासारव केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 7, 2016 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close