S M L

आयपीएलच्या पहिल्या सामन्याला कोर्टाचा हिरवा कंदील

Sachin Salve | Updated On: Apr 7, 2016 05:42 PM IST

आयपीएलच्या पहिल्या सामन्याला कोर्टाचा हिरवा कंदील

07 एप्रिल : राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतांना आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्यात यावे अशी मागणी होत आहे. पण, आज मुंबई हायकोर्टाने बीसीसीआयला तुर्तास दिलासा देत आयपीएलच्या पहिल्या सामन्याला हिरवा कंदील दिलाय. तसंच राज्य सरकारला 12 एप्रिलपर्यंत सविस्तर उत्तर देण्याचे आदेशही कोर्टाने दिली आहे.

राज्यात आधीच दुष्काळ परिस्थिती असताना आयपीएलसाठी पाणी वाया का घालवायचे ?, लोकांपेक्षा आयपीएल महत्त्वाचे आहे का ? असा सवाल बुधवारी मुंबई हायकोर्टाने उपस्थिती करत राज्य सरकार आणि एमसीएला फटकारलं होतं. तसंच दुष्काळाच्या परिस्थितीत आयपीएलचे सामने राज्याबाहेर का खेळवू नये असा सवालही कोर्टाने विचारला होता.

आयपीएल मॅचेसदरम्यान, मुंबई, पुणे आणि नागपूरच्या स्टेडियमवर खेळपट्‌ट्यांची निगा राखण्यासाठी 60 लाख लीटर पाण्याचा वापर करण्यात येतो. त्याविरोधात केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवर आज दुसर्‍या दिवशीही कोर्टात सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी आजही राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवले जावेत अशी मागणी लावून धरली. तर पाण्याचं नियोजन करून काटकसरीने वापर करू अशी ग्वाही एमसीएने कोर्टात दिली. तसंच पहिल्या सामन्याची तयारीही आता पूर्ण झाली असून सर्व तिकीटांची विक्रीही झालीये अशी माहितीही एमसीएने कोर्टात दिली.

कोर्टाने यासंबंधी याचिका उशिरा दाखल करण्यात आली असून पहिली मॅच खेळवण्यास परवानगी दिलीये. आणि इतर मॅचेस खेळवायच्या की नाही आणि पाण्याची नासाडी कशी रोखणार याबाबत 12 एप्रिलपर्यंत सविस्तर उत्तर देण्याचे राज्य सरकारला आदेश दिले आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे आता ठरल्याप्रमाणे आयपीएलला सुरुवात होणार आहे. येत्या 9 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध पुणे मॅच रंगणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 7, 2016 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close