S M L

ह्रतिकला अटक करा, कंगनाचं पोलीस आयुक्तांना पत्र

Sachin Salve | Updated On: Apr 7, 2016 07:12 PM IST

ह्रतिकला अटक करा, कंगनाचं पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई- 06 एप्रिल : अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलाय. ह्रतिकला अटक करा अशी मागणी करणारं पत्रच कंगनानं थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहीलंय. ह्रतिक आपले खासगी फोटो आणि पत्रं सगळीकडे परसरवतोय असा आरोप करत तिनं तक्रार दाखल केलीये. ह्रतिक कंगनाचं चारित्र्यहनन करत असल्याचा आरोप कंगनाच्या वकिलांनी केलाय. एका ट्विटवरून हा वाद सुरू केलाय.

'क्रिश 3'मध्ये ह्रतिक आणि कंगना हे दोघे एकत्र दिसले. पण, या सिनेमात सुरुवातील ज्या प्रमाणे कंगना आणि ह्रतिक एकमेकांविरोधात उभे ठाकले होते तसाच प्रसंग आता रिअललाईफमध्ये उद्भवला आहे. कंगना आणि ह्रतिक आधी ट्विटरवर एकमेकांना टोमणे मारत होते.

कालंतराने हा वाद चिघळला. दोघांनी एकमेकांना थेट कायदेशीर नोटीस बजावल्यात. मध्यंतरी कंगनाने हृतिकला सीली एक्स म्हटलं होतं आणि त्यानंतर हेच ट्विट मोठा चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे हृतिकने कंगनाला नोटीस पाठवली होती. ज्यात बदनामी केल्याचा दावा हृतिकने कंगनावर केला होता.

यानंतर कंगनाने देखील तिच्या वकिलामार्फत हृतिकला नोटीस पाठवलीये ज्यात तिने स्पष्ट केलंय की मी माझ्या एक्स विषयी बोलताना कुठेही हृतिकच्या नावाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे माझ्यावरचे हे आरोप चुकीचे आहेत असं देखील तिने या नोटिसमध्ये म्हटलंय.आता वाद आणखी चिघळला असून ह्रतिकला अटक करा असं पत्रच कंगनाने पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना लिहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 7, 2016 07:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close