S M L

मुंबईचा पराभव

20 मार्चडीएलएफ आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सच्या विजयाला बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनं ब्रेक लावला आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर रंगलेल्या मॅचमध्ये बंगलोरने 7 विकेट राखून मुंबईचा पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबई इंडियन्सने 9 विकेट गमावत 151 रन्स केले. बंगलोरच्या भेदक बॉलिंगसमोर मुंबईच्या एकाही बॅट्समनला खास कामगिरी करता आली नाही. बंगलोरतर्फे डेल स्टेन आणि विनय कुमारने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. याला उत्तर देताना बंगलोर रॉयलने दमदार सुरुवात केली. ओपनिंगला आलेल्या जॅक कॅलिस आणि मनिष पांडेने पहिल्या विकेटसाठी 85 रन्सची पार्टनरशिप करत विजयाचा पाया रचला. पांडे 40 रन्सवर आऊट झाला. पण फॉर्ममध्ये असलेल्या जॅक कॅलिसनं 66 रन्सची शानदार खेळी करत टीमला विजय मिळवून दिला. बंगलोर रॉयलचा हा तिसरा विजय ठरलाय. या विजयाबरोबरच बंगलोरने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2010 06:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2010 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close