S M L

मी शंभरी गाठणारच..!, मा.गो.वैद्य यांचा राज ठाकरेंना प्रतिटोला

Samruddha Bhambure | Updated On: Apr 9, 2016 06:47 PM IST

मी शंभरी गाठणारच..!, मा.गो.वैद्य यांचा राज ठाकरेंना प्रतिटोला

09 एप्रिल :  स्वतंत्र विदर्भाच्या मुदद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांनी शनिवारी नागपूरमध्ये प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरेंनी एखाद्या मारेकर्‍याकडून माझी हत्या करवून घेतली नाहीतर मी माझ्या वयाची शंभरी पूर्ण करेल, असं वैद्य यांनी म्हटलं.

राज यांनी काल शिवाजी पार्कवरील सभेत वैद्य यांनी उद्देशून ज्यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ आली ते स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याची भाषा करतात, असं म्हटलं होतं. राज यांच्या याच टीकेला मा. गो. वैद्य यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्या जगातून जाण्याची वेळ आली, असं राज यांनी म्हटलं. मला आणि त्यांना दोघांनाही एक दिवस या जगातून जायचंच आहे. मात्र, माझी सध्याची प्रकृती पाहता मी आणखी 7 वर्षे म्हणजे माझ्या वयाची शंभरी पूर्ण करेन, असं वाटते. राज ठाकरे यांनी माझ्यावर गोळ्या झाडायला एखाद्याला पिस्तूल घेऊन पाठवलं नाहीतर मी नक्कीच माझी शंभरी साजरी करेन, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मा.गो.वैद्य यांनी लहान राज्यांच्या आपल्या मागणीचा पुनरूच्चार करताना नवीन राज्य पुर्नरचना आयोगाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केलं. किमान 50 लाख लोकसंख्येचं राज्य निर्माण करण्याची गरज आहे. राज्य वेगळे झाले तरी भाषा एकच असेल. वेगळ्या विदर्भाला विरोध करणार्‍यांसाठी भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय?, असा सवालही वैद्य यांनी यावेळी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2016 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close