S M L

गुंडगिरीवर मुख्यमंत्री बेफिकीर

22 मार्चराज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबादमधील गुंडगिरीकडे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कानाडोळा केला आहे.राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल औरंगाबादमध्ये शिवीगाळ करत नगरसेवकाच्या समर्थकाला मारहाण केली होती. पण यात काही विशेष नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आज हात झटकले आहेत.एकूणच अब्दुल सत्तार यांच्या गुंडगिरीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. नगरसेवकाच्या समर्थकाला मारहाण करणार्‍या सत्तार यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. उलट पोलीस कोर्‍या कागदावर सही मागत असल्याचा खळबळजनक आरोप मारहाणीत जखमी झालेल्या महमद मुश्ताक यांनी केला आहे. सत्तार यांनी केलेल्या बेदम मारहाणीत महमद मुश्ताक हे गंभीर जखमी झालेत. त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने मुश्ताक यांना मिलकॉर्नर भागातील साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.मुश्ताक यांच्या बरगडीला फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी मुश्ताक यांनी अजून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही. पण पोलीस आपल्याकडे कोर्‍या कागदावर सही मागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. औचित्याचा मुद्दा उपस्थित करणारअब्दुल सत्तार यांच्या गुंडगिरीप्रकरणी आज विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. सत्तार यांना निवेदन द्यायला भाग पाडू, एका राज्यमंत्र्याला हे वर्तन शोभणारे नाही, असे फुंडकर यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2010 08:23 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2010 08:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close