S M L

लातूरला पाणी नेणारी स्पेशल वॉटर एक्स्प्रेस मिरजकडे रवाना

Samruddha Bhambure | Updated On: Apr 9, 2016 10:17 PM IST

लातूरला पाणी नेणारी स्पेशल वॉटर एक्स्प्रेस मिरजकडे रवाना

09 एप्रिल :  लातूरला पाणी नेणारी स्पेशल वॉटर एक्स्प्रेस अखेर कोटाहून मिरजकडे रवाना झाली आहे. ही स्पेशल ट्रेन काल दुपारीच कोट्‌ट्याहून निघाली असून आज रात्री उशीरापर्यंत मिरजला पोहोचेल. अंदाजे 25 लाख लीटर पाणी या ट्रेनमधून वाहून नेलं जाऊ शकतं. दुष्काळामुळे लातूर मध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. त्यामुळेच लातूरला मिरजहून रेल्वेने पाणी पुरवठा केला जाणार आहे. लातूरसाठी रेल्वेमंत्र्यांनी 2 ट्रेन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातली पहिली ट्रेन मिरजच्या वाटेवर आहे तर दुसरी ट्रेन ही 15 एप्रिलपर्यंत मिळेल अशी माहिती रेल्वे विभागकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, लातूरला रेलवे मार्गे पाणी देण्यासाठी मिरज रेल्वे जंक्शनवर अडीच किमीची नवी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु आहे. रेल्वेच्या जल सुद्धीकरण केंद्रापासून ते रेल्वेच्या टँकरमध्ये पाणि भरण्यापर्यंत नविन पाईप लाीन टाकली जाते. ती टाकण्यासाठी पुढचे 3-4 दिवस लागणार आहेत अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड़ यांनी दिली.

लातूरकरांची तहान अखेर भागणार

- कोट्टावरून वॅगन आज मिरजला पोहोचणार

- कृष्णा नदीतून मिरज स्टेशनपर्यंत पाईपलाईननं पाणी आणणार

- अडीच किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू

- पर्यायी व्यवस्था होईपर्यंत प्लॅटफॉर्मवरून पाणी भरणार

- प्रत्येक वॅगनमध्ये 50 हजार लीटर पाणी

- एका खेपेस 25 लाख लीटर पाणी नेलं जाणार

- 13 तारखेला पहिली ट्रेन मिरजसाठी रवाना होणार

- तीन दिवसांतून दोन रेल्वे वॅगन

- 6 दिवसांत 50 लाख लीटर पाणी लातूरकरांना मिळणार

- लातूर स्टेशनच्या बाजूला पाण्याचे हौद तयार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2016 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close