S M L

IPL राज्याबाहेर गेल्यास 100 कोटींचा महसूल बुडेल, अनुराग ठाकुरांचा मुख्यमंत्र्यांना अहेर

Sachin Salve | Updated On: Apr 10, 2016 01:47 PM IST

IPL राज्याबाहेर गेल्यास 100 कोटींचा महसूल बुडेल, अनुराग ठाकुरांचा मुख्यमंत्र्यांना अहेर

नवी मुंबई - 10 एप्रिल : आयपीएलचे सामने राज्याबाहेर गेल्यास महाराष्ट्राला तब्बल 100 कोटींच्या महसुलास मुकावे लागेल, असं स्पष्ट करत बीसीसीआयचे उपाध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा अहेर दिलाय.

आयपीएलवरून मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलंय. त्यामुळे आयपीएलच्या मॅचेस राज्यात होतील की नाही याबद्दल शंका निर्माण झाल्यात. आयपीएलच्या सर्व मॅचेस दुसर्‍या राज्यात हलवल्या तरी चालतील पण त्यासाठी राज्य सरकार पाणी देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. पण, भाजपचे खासदार आणि बीसीसीआयचे  सचिव अनुराग ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर दिला आहे.

आयपीएलचे सामने राज्याबाहेर गेल्यास महाराष्ट्राला तब्बल 100 कोटींच्या महसुलास मुकावे लागेल, असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं. तसंच आयपीएलमधून मिळणार्‍या महसुलाचा वापर दुष्काळी भागासाठी कसा करता येऊ शकेल, हे पाहणे राज्य सरकारची जबाबदारी असल्याचंही ठाकूर यांनी सुनावलं. नवी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या एका माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ठाकूर माहिती तंत्रज्ञानविषयक संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2016 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close