S M L

युती सरकारचा औषध घोटाळा ?, 297 कोटींची औषध खरेदी वादात

Sachin Salve | Updated On: Apr 10, 2016 02:24 PM IST

युती सरकारचा औषध घोटाळा ?, 297 कोटींची औषध खरेदी वादात

10 एप्रिल : चिक्की घोटाळ्याचे प्रकरण न्यायालयात असताना आता युती सरकारवर औषध घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. आरोग्यविभागाची तब्बल 297 कोटी रुपयांची औषध खरेदी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. आवश्यकता नसतांनाही ही खरेदी झाल्याचा आरोप करण्यात येतोय.

राज्यातील 26 महापालिका 65 नगरपालिका आणि 4 कटक मंडळांसाठी ही खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. 31 मार्च 2015 ला या खरेदीचे आदेश देण्यात आलेत. अनेक ठिकाणी या औषधांची आवश्यकता नाही असं पत्र आरोग्यसंचालकांना दिल्याचं समोर येतंय. यामध्ये ठाण्याचे आरोग्यसेवा उपसंचालक यांनी औषधी नको असल्याचं म्हटलंय.

त्याचबरोबर अनेक रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्यानं औषधांच करायच काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. ही निविदा 549 औषधांसाठी मागविण्यात आली होती. यासाठी शिलाँग, मिझोराम यासारख्या राज्यातही वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आल्या होता असा आरोप होतोय.

औषध खरेदी करण्यासाठी प्रधानसचिवांच्या अध्यक्षतेखाली 40 जणांची समिती आहे. ही समिती राज्यातील 4 कोटी 68 लाख रुग्णांसाठी औषध खरेदी करते. साथीच्या आजारात ही संख्या 5 कोटींवर पण जाण्याची शक्यता असते. महापालिकांसाठी औषध खरेदी करण्याचा अधिकार महापालिकांना आहे, राज्यसरकारला नाही.

कुठल्याही चाैकशीला तयार - दीपक सावंत

जर अधिकार्‍यांनी औषधं नको असं म्हटलं असेल तर तसे पुरावे द्यावेत कुठलीही चौकशी करायला मी तयार असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी स्पष्ट केलंय. तसंच औषधं प्रमाणापेक्षा जास्त खरेदी केली असतील .तर त्यावर कारवाई केली जाईल असंही सावंत म्हणाले. आरोग्य खातं माझ्याकडून हिसकावून घेतलं जाण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही त्यांनी केला.

युतीचा औषध खरे़दी घोटाळा ?

- तब्बल 297 कोटींच्या औषधांची मनमानी पद्धतीनं खरेदी उघडकीला

- शिलाँग, गंगटोक, दिब्रुगड इथल्या दैनिकांमध्ये औषध खरेदीच्या जाहिराती

- या राज्यांमध्ये औषध कंपन्याच नाहीत

- 549 औषधांसाठी मागवल्या निविदा

- प्रत्यक्षात खरेदीचा आकडा द्यायला सार्वजनिक आरोग्य विभागाची टाळाटाळ

- 26 महापालिका, 65 नगरपालिका, 4 कटक मंडळांसाठी औषध खरेदी

- अनेक ठिकाणी या औषधांची आवश्यकता नाही असं पत्र आरोग्यसंचालकांना दिलं

- ठाण्यात औषधांचा साठा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2016 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close