S M L

धावत्या कारमध्ये पतीने केली पत्नीची हत्या

Sachin Salve | Updated On: Apr 10, 2016 02:36 PM IST

धावत्या कारमध्ये पतीने केली पत्नीची हत्या

अहमदनगर - 10 एप्रिल : देवदर्शनाला जाण्याचा बहाणा करून मच्छिंद्र अकोलकर या व्यक्तीनं धावत्या कारमध्ये पत्नीची हत्या केली आणि तिला जाळल्याची धक्कादायक घटना घडलेय. अश्विनी अकोलकर असं या मृत महिलेचं नाव आहे. पाथर्डी तालुक्यातल्या तीसगाव - करंजी परिसरात हे हत्याकांड घडलंय. या प्रकरणी पोलिसांनी कारचा ड्रायव्हर बाबासाहेब मराठेला ताब्यात घेतलंय.

मछिंद्रनं गुरुवारी रात्री मढीला देव दर्शनाला जाण्याचं निमित्त करुन पत्नीला कारमध्ये बसवलं. त्यावेळी प्रवासात त्यानं चालत्या गाडीत हत्यारानं गळा चिरुन पत्नीची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी जामखेडच्या घाटात नेऊन पेट्रोल ओतून पत्नीला जाळलं. या प्रकरणी मच्छिंद्रनं धमकावून गाडी जामखेडला नेल्याचं चालकानं सांगितलंय. याबाबतचा पोलीस पुढील तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2016 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close