S M L

नागपूर मेट्रोसाठी 3750 कोटींच्या कर्जाचा करार

Sachin Salve | Updated On: Apr 10, 2016 04:43 PM IST

नागपूर मेट्रोसाठी 3750 कोटींच्या कर्जाचा करार

10 एप्रिल : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि केएफडब्लू जर्मनी यांच्यात नागपूर मेट्रोसाठी 3750 कोटींच्या कर्जाचा करार करण्यात आलाय. या कराराच्या हस्ताक्षर समारंभाला दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते.

या कार्यक्रमात नागपूर मेट्रोच्या दोन मार्गांना जोडणारा नवा मार्ग महानगर पालिकेच्या लंडन स्ट्रीट प्रकल्पाच्या जागेवर करण्याच्या सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यात. वर्धा रोड ते हिंगणा रोडपर्यंत डिफेंस प्रकल्पाच्या रेल्वेलाईनवर लंडन स्ट्रीट प्रकल्प प्रस्तावित आहे. या ठिकाणी मेट्रो रेल्वेचा मार्ग करून त्या खाली लंडन स्ट्रीटची दुकाने सुरू करण्याची कल्पनाही नितीन गडकरी यांनी केलीये. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूर मेट्रोसाठी हा तिसर्‍या प्रकल्पाची गरज असल्याचं सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2016 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close