S M L

सुधारित डान्सबार विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Samruddha Bhambure | Updated On: Apr 11, 2016 03:19 PM IST

dance-bar-bar-girls_bdbdbae0-e058-11e5-9948-13623a58218c

मुंबई – 11 एप्रिल : राज्य मंत्रिमंडळाने आज (सोमवारी) सुधारित डान्सबार विधेयक मंजूर केलं आहे. दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीने आपला अहवाल सरकारला दिला होता. त्यानंतर सरकारने हा अहवाल कॅबिनेटसमोर ठेवला. कॅबिनेटनं अखेर आज मंजुरी दिली आहे. मात्र डान्सबारवरील अटी या अधिक कडक करण्यात आल्या आहेत.

नवीन सुधारित विधयेकानुसार आता ग्राहक बारबालांवर पैशांची उधळण करू शकणार नाहीत. डान्सबारमध्ये नाचणार्‍या नर्तक-नर्तकीचे वय किमान 21 वर्षे असावं, अशीही अट या विधेयकात आहे.

या विधेयकातील तरतूदी पुढीलप्रमाणे :

- प्रत्येक बारसाठी किमान 3 महिला सुरक्षारक्षक असावेत

- महिला कर्मचार्‍यांना घरापर्यंत सुरक्षित पोहचता यावे याचीही व्यवस्था करण्यात यावी

- आवश्यक असेल तर पाळणाघराची सुविधाही द्यावी

- परमिट रूम आणि नृत्य कक्ष यामध्ये पक्की विभाजक भिंत असेल

- कठडा आणि ग्राहक बैठक क्षेत्र यामध्ये 5 फुटाचे अंतर असेल

- ग्राहकाने विभागणी पार करू नये, कमीत कमी 6 इंच उंचीचा कठडा असेल

- एका मंचावर केवळ 4 नर्तिका / नर्तक / कलाकार यांना नृत्यविष्कारची परवानगी

- नर्तक-नर्तकीचे वय हे किमान 21 वर्ष असावे

- डान्सबारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक तसंच 30 दिवसांचे रेकॉर्ड राखून ठेवणे आवश्यक

- नृत्यविष्कार कोणत्याही प्रकारे अश्लील असणार नाही आणि महिलांच्या प्रतिष्ठेला कोणतीही हानी पोहोचवणार नाही याची परवानाधारक खात्री करेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2016 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close