S M L

महाराष्ट्राच्या मल्लांना सतत डावललं जातंय, पैलवान राहुल आवरेचा आरोप

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2016 03:59 PM IST

महाराष्ट्राच्या मल्लांना सतत डावललं जातंय, पैलवान राहुल आवरेचा आरोप

12 एप्रिल : महाराष्ट्राच्या मल्लांना सतत डावलण्यात येत आहे, अशी खंत पैलवान राहुल आवारेनं व्यक्त केलीये. याप्रकरणी राहुलनं राजकीय नेत्यांची देखील भेट घेतली. परंतू, दबाव टाकला तर राहुलवर हक्कभंगाची कारवाई करू असा इशारा महासंघाकडून देण्यात आलाय.

राहुलनं ऑलिम्पिक पात्रता फेरीत दिल्लीच्या अमित कुमार आणि संदीप तोमर या मल्लांना पराभूत केलं होतं. यानंतर त्याला मंगोलिया आणि तुर्कस्तान इथं होणार्‍या ऑलिम्पिक निवड स्पर्धेसाठी व्हिसा दिला नाही.

उलट पात्रता फेरीत राहुलने ज्या मल्लांना हरवलं त्यांचीच निवड ऑलिम्पिकसाठी करण्यात आल्याने कुस्तीप्रेमींमध्ये मोठी नाराजी आहे. विशेष म्हणजे राहुलचे प्रशिक्षक अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनाही ऑलम्पिकमधून डावलण्यात आलं होतं.

उत्तरेतल्या कुस्ती लॉबीचा भारतीय कुस्ती महासंघावर दबदबा असल्याने महाराष्ट्राच्या मल्लांवर सातत्याने अन्याय होत असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2016 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close