S M L

परभणीत राहटी बंधार्‍यात लाखो लिटर पाण्याची गळती

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2016 04:40 PM IST

परभणीत राहटी बंधार्‍यात लाखो लिटर पाण्याची गळती

परभणी - 12 एप्रिल : पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या परभणीकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महापालिकेचे नेते आणि अधिकारी करत असल्याचं समोर आलंय. पाणी पुरवठा करणार्‍या मनपाच्या राहटी बंधार्‍याच्या 46 दरवाज्यांमधून लाखो लिटर पाणी वाया जातंय. मात्र, त्याकडे कुणीही बघायला मात्र तयार नाहीये.

परभणी शहरासाठी येलदरी धरणाचे पाणी आरक्षित करण्यात करण्यात आलंय. तिथून ते पाणी शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या या राहटी बंधार्‍यात येतं. पण या बंधार्‍याचे सर्व 46 दरवाजे खराब झाले आहेत. त्यामुळे त्यातून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातंय. याआधी आयबीयन-लोकमतने बातमी दाखवल्यानंतर या दरवाज्यांवर पॉलिथीन लावण्यात आलं. तेही आता खराब झालंय.

विशेष म्हणजे शहरात पाण्याच्या टाक्यांजवळ कलम 144 लागू आहे. प्रत्येक नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे असे असताना या बंधार्‍यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत महापौर,उपमहापौर,स्थायी समिती सभापती न आयुक्त यांचे लक्ष आहे, त्यामुळे परभणीकरांना जे पाणी जून महिन्यापर्यंत पुरायला पाहिजे ते अशा प्रकारची गळती असल्याने केवळ 8 ते 15 दिवसांच पुरणार असल्याने याबाबत शहरवासीयांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2016 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close