S M L

साडी नेसूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करा, तृप्ती देसाईंना पोलिसांचा सल्ला

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2016 09:37 PM IST

साडी नेसूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करा, तृप्ती देसाईंना पोलिसांचा सल्ला

कोल्हापूर - 12 एप्रिल : अंबाबाई मंदिरामध्ये महिलांच्या गाभारा प्रवेशावर तोडगा निघालेला असला तरी आता याच प्रवेशाच्या मुद्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साडी नेसून मंदिरात प्रवेश करा असा सल्लाच पोलिसांनी आणि विश्वस्तांनी दिला आहे.

काल सोमवारी एका सर्वसमावेशक बैठकीनंतर कोल्हापूरच्या मंदिरात 6 महिलांनी प्रातिनिधीक स्वरुपात जाऊन गाभार्‍यात दर्श घेतलं होतं. पण त्यापूर्वीच तृप्ती देसाई यांनी 13 तारखेला म्हणजेच उद्या (बुधवारी) गाभार्‍यात जाण्याचा इशारा दिला होता. पण या निर्णयानंतर उद्या तृप्ती देसाई यांनी भूमाता ब्रिगेड विजयी रॅली काढत गाभार्‍यात जाऊन दर्शन घेणार आहे.

पण जुना राजवाडा पोलिसांनी देसाई यांना गाभार्‍यात यायचं असेल तरी साडी घालूनच यावं लागेल अशी सूचना दिलीय. तशी एक ऑडिओ क्लिप स्वतः तृप्ती देसाई यांनी माध्यमांकडे दिलीय.

त्यामुळे उद्या कोल्हापूरमध्ये नेमकं काय होणार याकडं आता राज्याचं लक्ष असणार आहे. पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ असं सांगताहेत. तर तृप्ती देसाई विनासाडी मंदिरात प्रवेश करण्यावर ठाम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2016 09:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close