S M L

औषध घोटाळ्याप्रकरणी आरोग्य संचालक निलंबित

Sachin Salve | Updated On: Apr 13, 2016 02:05 PM IST

औषध घोटाळ्याप्रकरणी आरोग्य संचालक निलंबित

13 एप्रिल : आरोग्य विभागाच्या 297 कोटींच्या औषध खरेदी घोटाळ्यात अखेर आरोग्य संचालक सतिश पवार यांना निलंबित करण्यात आलंय. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली आहे.

चिक्की घोटाळ्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. आरोग्य विभागाने गरज नसतानाही जास्तीची औषध खरेदी केली होती. यावरून विरोधकांनी आवाज उठवताच आरोग्य मंत्र्यांनी ही घोषणा केलीय. या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचंही दीपक सावंत यांनी सभागृहात सांगितलंय. अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय्य हे या घोटाळ्याची प्राथमिक चौकशी करणार असून त्या नंतर निवृत्त न्यायाधिशांच्या देखरेखीखाली एसीबी ही चौकशी करणार आहे. विरोधक मात्र, सरकारच्या या कारवाईवर अजूनही समाधानी नाहीत.

काय आहे हा घोटाळा ?

राज्यातील 26 महापालिका 65 नगरपालिका आणि 4 कटक मंडळांसाठी 297 कोटींची औषधं खरेदी करण्यात आली. 31 मार्च 2015 ला या खरेदीचे आदेश देण्यात आले होते. अनेक ठिकाणी या औषधांची आवश्यकता नाही असं पत्र आरोग्यसंचालकांना दिल्याचं समोर येतंय. यामध्ये ठाण्याचे आरोग्यसेवा उपसंचालक यांनी औषधी नको असल्याचं म्हटलंय.

त्याचबरोबर अनेक रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्यानं औषधांचं करायचं काय ?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ही निविदा 549 औषधांसाठी मागविण्यात आली होती. यासाठी शिलाँग, मिझोराम यासारख्या राज्यातही वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आल्या होता असा आरोप होतोय.

औषध खरेदी करण्यासाठी प्रधानसचिवांच्या अध्यक्षतेखाली 40 जणांची समिती आहे. ही समिती राज्यातील 4 कोटी 68 लाख रुग्णांसाठी औषध खरेदी करते. साथीच्या आजारात ही संख्या 5 कोटींवर पण जाण्याची शक्यता असते. महापालिकांसाठी औषध खरेदी करण्याचा अधिकार महापालिकांना आहे, राज्यसरकारला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2016 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close