S M L

शिवसेना मांडणार अखंड महाराष्ट्राचा ठराव ?

Sachin Salve | Updated On: Apr 13, 2016 02:35 PM IST

shiva sena 1मुंबई - 13 एप्रिल : अर्थसंकल्पपीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेना विधान परिषदेत अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्याची शक्यता आहे.

या ठरावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीही पाठिंबा देण्याची शक्यता असून या ठरावा आडून भाजपला कोंडीत पकडण्याची शिवसेनेची व्युव्हरचना आहे.

दुष्काळ, भारत माता की जय, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा या अधिनेशनात चांगलाच गाजला. तर सरकारनंही विरोधकांचे मुद्दे परतवण्याचे प्रयत्न करत जोरदार बचाव केला.

याच अधिवेशनात औषध घोटाळाही चांगलाच गाजला. त्यावर निलंबनाची कारवाईही झाली पण विरोधक त्यावर समाधानी नाहीत. वे

गळा विदर्भ आणि मराठवाड्याची मागणी करणारे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना निलंबित करण्यात आलंय. आता शिवसेनेनं अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडण्याची भूमिका घेतलीये. महाराष्ट्राचे तुकडे होऊ नये अशी ठाम भूमिका सेनेनं याआधाही मांडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2016 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close