S M L

आणखी एक वॉटर एक्स्प्रेस 5 लाख लिटर पाणी घेऊन लातूरकडे रवाना

Sachin Salve | Updated On: Apr 13, 2016 03:04 PM IST

आणखी एक वॉटर एक्स्प्रेस 5 लाख लिटर पाणी घेऊन लातूरकडे रवाना

सांगली - 13 एप्रिल : दुसर्‍या टप्प्यात लातूरला रेल्वे मार्गे पाणी देण्यासाठी आणखीन एक ' वॉटर एक्स्प्रेस ' मिरजेतून लातूरकडे रवाना झाली आहे. दहा टँकमधून 5 लाख लीटर पाणी घेऊनही रेल्वे लातूर च्या दिशेने रवाना झाली आहे.

या आधी पहिल्या टप्यात 10 टँकमधून 5 लाख लीटर पाणी मिरजेतून-लातूरकड़े रेल्वेतून पाठवण्यात आले होते. आज 11 वाजून 5 मिनिटांनी ही ट्रेन निघाली असून लातूरकरांना या पाण्यामुळे दिलासा मिळणार आहे. तर रेल्वे जल शुद्धीकरण ते पाणी भरण्याच्या ठिकाणापर्यंतची अडीच किलो मिटरची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हे जलद गतीने सुरू असून येत्या शुक्रवारपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती कंत्राटदार शशांक जाधव यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2016 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close