S M L

अखेर अलमपूरमध्ये आंबेडकर जयंती मिरवणुकीला परवानगी

Sachin Salve | Updated On: Apr 14, 2016 09:10 AM IST

amalpur3बुलडाणा - 14 एप्रिल : नांदुरा तालुक्यातल्या अलमपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीवरुन वाद झाला होता.

गावकर्‍यांना प्रशासनाकडून परवानगी मिळत नव्हती. आयबीएन लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने 18 एप्रिलच्या दिवशी मिरवणुकीची परवानगी दिली आहे.

गावात सकाळी 8 ते 12 वाजेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीये. नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखत मिरवणूक शांततेत पार पाडावी तसंच मिरवणुकीत शांतता राहील याबाबत पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2016 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close