S M L

लातुरात पोहोचली तिसरी पाणी एक्स्प्रेस

Samruddha Bhambure | Updated On: Apr 14, 2016 10:49 PM IST

लातुरात पोहोचली तिसरी पाणी एक्स्प्रेस

14 एप्रिल :  भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईने होरपळलेल्या लातूरमध्ये आज तिसरी पाणी एक्स्प्रेस पोहोचली. यामुळे लातुरकारांना आतापर्यंत रेल्वेने 15 लाख पाणी मिळाले आहे.

दुष्काळग्रस्त लातुरकरांची तहान भागवण्यासाठी मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 5 लाख लिटर पाणी असलेली एक्स्प्रेस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज (गुरूवारी) सकाळी 10.45 वाजता मिरजहून रवाना केलेली तिसरी पाणी एक्स्प्रेस लातूरमध्ये पोहोचली. या एक्स्प्रेसमधून 5 लाख लिटर पाणी लातुरकरांना मिळालं आहे.

सध्या रेल्वेच्या फलाटावर पाणी भरण्यात येत आहे. मिरज स्थानकावर रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून यार्डापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. ते काम लवकरच पूर्ण होईल. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारपासून एक्स्प्रेसला पाण्याचे 50 वॅगन जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटद्वारे दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2016 09:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close