S M L

मुंबई इंडियन्स विजयी

22 मार्चमुंबईच्या ब्रेबॉर्नवर रंगलेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला तो कॅप्टन सचिन तेंडुलकर. पहिली बॅटिंग करणार्‍या नाईट रायडर्सने152 रन्सचे टार्गेट मुंबईसमोर ठेवले. याला मुंबईने दमदार उत्तर दिले.ओपनिंगला आलेल्या सचिन तेंडुलकरने शिखर धवनबरोबर पहिल्या विकेटसाठी 61 रन्सची पार्टनरशिप केली. धवन 23 रन्सवर आऊट झाला. पण सचिन तेंडुलकरची धडाकेबाज बॅटिंग सुरुच होती. त्याने कॅप्टन इनिंग खेळत 71 रन्स केले आणि मुंबईला 7 विकेट राखून विजय मिळवून दिला. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या नाईट रायडर्सने 3 विकेट गमावत 151 रन्स केले. मुंबई इंडियन्सच्या भेदक बॉलिंगसमोर नाईट रायडर्सला मोठा स्कोअर उभारता आला नाही. नाईट रायडर्सच्या ख्रिस गेलने 75 रन्सची झुंजार खेळी केली. मुंबई इंडियन्सतर्फे झहीर खानने सर्वाधिक 2 तर हरभजन सिंगने 1 विकेट घेतली. आयपीएलच्या तिसर्‍या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2010 05:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2010 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close