S M L

प्रकृती बिघडल्यामुळे दिलीप कुमार लीलावती रूग्णालयात दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Apr 16, 2016 02:30 PM IST

प्रकृती बिघडल्यामुळे दिलीप कुमार लीलावती रूग्णालयात दाखल

मुंबई – 16 एप्रिल :  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती बिघाडल्याने काल रात्री उशीरा लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचं त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून दिलीप कुमार यांची तब्येत खालावली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे शुक्रवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची पत्नी सायरा बानो याही त्यांच्यासोबत आहेत.

'दिलीप कुमार यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढचे काही दिवस रूटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात ठेवावं लागणार आहे. दिलीप कुमार यांचे वय जवळपास 94 वर्षे आहे. त्यामुळे वाढत्या वयानुसार अशी दुखणी उद्भवत असतात. मात्र, चिंतेचे कोणतंही कारण नाही, अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2016 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close